घरमहाराष्ट्रबोगस प्रमाणपत्राप्रकरणी नवनीत राणा अडचणीत; अजामीनपात्र अटक वॉरंट जा

बोगस प्रमाणपत्राप्रकरणी नवनीत राणा अडचणीत; अजामीनपात्र अटक वॉरंट जा

Subscribe

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रा प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. तसेच शिवडी महानगर दंडाधिका कोर्टाने या वॉरंटवर मुलुंड पोलिसांनाही (Mulund Police) कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने अद्याप कारवाईला स्थगिती दिली नाही, त्यामुळे शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी 7 नोव्हेंबर रोजी पुढील कारवाई होणार आहे.

- Advertisement -

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर केला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करत प्रमाणपत्र मिळावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदरराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर हायकोर्टाने जून 2021 मध्ये नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द केलं होतं. यासह त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठवण्यात आला.

मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.


शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव; राज ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -