घरपालघरवसई-भाईंदरमध्ये लक्ष्मीपूजनानंतर अग्नीतांडव

वसई-भाईंदरमध्ये लक्ष्मीपूजनानंतर अग्नीतांडव

Subscribe

. यात जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली.मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

वसईः मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केल्यावर वसईत आगीच्या तब्बल सहा घटना घडल्या. तर मीरा भाईंदर परिसरात एकाच रात्रीत आगीच्या तब्बल २७ घटना घडल्या आहेत. यात जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली.मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. त्या आतषबाजीने एकट्या विरार शहरात तीन ठिकाणी आग लागली होती. विरार पूर्वेकडील गोपचरपाडा येथील एका कापसाच्या गोडाऊनमध्ये फटाक्याची ठिणगी पडल्याने कापसाने पेट घेतला. त्यात गोदामातील कापसाचा संपूर्ण साठा जळून खाक झाला. गोदाम इमारतीच्या तळमजल्यावरच असल्याने आग लागल्यानंतर धुराचे मोठे लोळ उठल्याने इमारतीत घबराट पसरली होती. त्यामुळे इमारतीमधील रहिवाशी घराबाहेर सुरक्षितस्थळी थांबले होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

त्याचरात्री विरार पूर्वेकडील मोहक सिटी येथे इमारतीच्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणार्‍या बांबूच्या फाटाला रॉकेटची ठिणगी पडून आग लागली होती. वसई- विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोचून आग नियंत्रणात आणली. त्याचबरोबर विरार पश्चिमेच्या नवापूर गावात रॉकेटच्या ठिणगीमुळे एका नारळाच्या झाडाला आग लागली होती. तेथेही वसई- विरार अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आग तात्काळ नियंत्रणात आणली आहे. वसई- पूर्वेकडील वसई फाटा येथील एका चप्पल गोदामाला भीषण आग लागली होती. रात्री १०.३० च्या सुमारास ही आग लागली. वसई- विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, ७ टँकर, २ अधिकारी आणि १६ अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली.आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र सामानाचे अतोनात नुकसान झाले.

- Advertisement -

मीरा भाईंदर शहरात २७ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. घरात लावलेल्या पणत्या, फटाके, शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणत आग लागली होती. गीतानगर परिसरातील गीता पुष्प या इमारतीत घरात असलेल्या पणत्यामुळे आग लागली असून यामध्ये जवळपास साडेतीन लाख रुपये किंमतीचे सामान जळाले. नयानगर मधील अस्मिता रिजन्सी या इमारतीच्या दुसरा मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झालेल आहे. यात सात लाख रुपयांची रोख रक्कम अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडली आहे. दिवाळीच्या दिवशी आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अग्निशमन दल त्याठिकाणी लवकरात लवकर पोचावे यासाठी विशेष व्यवस्थ मीरा भाईंदर शहरात करण्यात आलेली आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची २४ तास ड्युटी लावण्यात आली. त्यामुळे मीरा भाईंदर शहरात जरी मोठ्या प्रमाणात आग लागल्याच्या घटना घडल्या असल्या तरी देखील अग्निशमन दल सतर्क असल्यामुळे मोठे संकट टळले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -