घरपालघरवाड्यात मांगाठणे येथे रंगल्या रेड्यांच्या झुंजी

वाड्यात मांगाठणे येथे रंगल्या रेड्यांच्या झुंजी

Subscribe

. या रेड्यांच्या झुंजींना सात दशकांची परंपरा असून येथे कुठलाही अनुचित प्रकार कधीही घडला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

वाडा : तालुक्यातील मांगाठणे येथे भाऊबीज व दिवाळीच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंज स्पर्धेत पालघर व ठाणे जिल्ह्यातील १९ रेडा मालकांनी सहभाग घेतला होता. या रेड्यांच्या झुंजींना सात दशकांची परंपरा असून येथे कुठलाही अनुचित प्रकार कधीही घडला नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. शेतकरी बांधव वर्षंभर आपल्या शेतात घाम गाळत काबार-कष्ट करत असतो. दिवाळी सणामध्ये त्यांच्या आनंदात भर पडावी या प्रामाणिक हेतूने झुंजींचे आयोजन करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या झुंजींचा आनंद घेण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधव हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. या झुंज स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेडा मालकांना शाल, श्रीफळ,आकर्षक चषक व ५ हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती जितेश पाटील व हितेश पाटील यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्या मालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या झुंजी शांततेत पार पडल्या असून शेतकर्‍यांनी या झुंजींचा मनमुराद आनंद घेतला.
या रेडा झुंजी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अजित पाटील, सचिन पाटील, सुनील पाटील, हेमंत पाटील, विजय पाटील, बापू पाटील, वसंत पाटील, सुरेश पाटील, नंदू पाटील, संजय पाटील, रुपेश पाटील, गणेश पाटील, योगेश खंडागळे आदींनी विशेष परिश्रम
घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -