घरमहाराष्ट्रकांद्याचा झटका : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दर वाढण्याची शक्यता

कांद्याचा झटका : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दर वाढण्याची शक्यता

Subscribe

महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाला फटका बसला.

सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या कंदाच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. डिसेंबरमध्ये कांद्याची आवक होणार आहे. यामुळेच कांद्याची वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला याचा फटका बसणार आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकामधील हळवी कांद्याचेसुद्धा नुकसान झाले. याआधी पावसामुळे कांद्याचे नुकसान होत होते. पण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणारा कांदा खराब झाला. दरम्यान नवीन हळवी कांद्याची लागवड सध्या सुरू आहे. हा कांदा बाजारात यायला नवे वर्ष उजाडणार आहे,’ अशी माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान राज्यात चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात आहे; मात्र परतीच्या पावसामुळे या कांद्याचे सुमारे 40 ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. त्यामुळे हा कांदा बाजारात जरी आला, तरी त्यामुळे लोकांची गरज भागणार नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त राहिले तर दर आणखी वाढण्याची शक्यता पोमण यांनी वर्तविली. गणेशोत्सव, नवरात्र, दसऱ्यापर्यंत उपवास, व्रतवैकल्ये असल्याने या सणांच्या काळात कांद्याला फारशी मागणी नसते पण दसऱ्यानंतर कांद्याची मागणी वाढते दरम्यान कांद्याच्या परवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असते असे निरीक्षण सुद्धा नेंदविले जाते.

 

- Advertisement -

कांदा का महागणार?

– अतिवृष्टीमुळे ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये लागवड केलेली पिके वाया गेली

– हळवी अर्थात लाल कांद्याला फटका बसला

– परतीच्या पावसाचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये धुमाकूळ

– कर्नाटकासह महाराष्ट्रातील साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात भिजला

– आता डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात नव्या हंगामातील कांदा येण्याची शक्यता

– मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होणार

– साठवणुकीतील चांगल्या प्रतीच्या कांद्यापैकी 40 ते 50 टक्के माल पावसामुळे खराब

– ‘नाफेड’कडील अडीच लाख टन कांद्यापैकी 50 टक्के कांदा खराब. त्यापैकी 50 हजार टन कांद्याची गुवाहाटी, दिल्ली, चंडीगड या ठिकाणी ‘नाफेड’कडून विक्री. आता 50 हजार टन साठा शिल्लक.

कांद्याचा पुरवठा होतो कोठे?

– महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांना पुरवठा

– राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन होते. तिथून दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांना पुरवठा

 

कांद्याचे 20 ऑक्टोबरनंतरचे घाऊक बाजारातील किलोचे दर

वर्ष – दर (रुपयांत)

2017 – 15 ते 20

2018 – 30 ते 40

2019- 40 ते 50

2020- 50 ते 70

2021- 25 ते 35

30 ऑक्टोबर 2022 – 25 ते 32


हे ही वाचा – इथे प्रश्न माझ्या अस्तित्वाचा; कार्यकर्त्यांशी बोलून मगच भूमिका स्पष्ट करेन – बच्चू कडू

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -