घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजादा बसेस सोडूनही प्रवाशांचे हाल सर्वच बसस्थानकांवर तोबा गर्दी

जादा बसेस सोडूनही प्रवाशांचे हाल सर्वच बसस्थानकांवर तोबा गर्दी

Subscribe

नाशिक : आठवडाभर दिवाळीच्या सुटीचा आनंद घेतल्यानंतर नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी परतणार्‍या प्रवाशांमुळे शनिवार आणि रविवार (दि. २९, ३०) या दोन्ही दिवशी शहरासह जिल्हाभरातील प्रमुख बसस्थानकांवर तोबा गर्दी झाली होती. एसटी महामंडळाने जादा बसेस सोडूनदेखील प्रवाशांना बसेससाठी मोठी प्रतिक्षा करावी लागली. दिवाळीच्या सुटीला जोडून अनेकांनी वीकेण्डचाही आनंद लुटला. मात्र, सोमवारपासून सर्व सरकारी व खासगी कार्यालयांचे कामकाज पूर्ववत होणार असल्याने कामावर हजर राहण्यासाठी गावाकडून शहरांकडे परतणार्‍यांची रविवारी बसस्थानकांवर प्रचंड गर्दी होती. त्याचा थेट परिणाम बुकिंगवरही झाला. त्यामुळे तिकीट काठण्यासाठी अनेकांना सुमारे एक-एक तास रांगेत उभे राहावे लागले.

दिवाळी सणासाठी गावाकडे जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एस. टी. महामंडळाच्या नाशिक कार्यालयाने नाशिक-धुळे, नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई अशा विविध मार्गांवर जादा बसेसचे नियोजन केले होते. या सेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसादही लाभला. त्यामुळे एसटी महामंडळाने अनेक मार्गांवरील जादा बसेस सुरूच ठेवल्या. परतीसाठी निघालेल्या प्रवाशांच्या गर्दीपुढे या जादा बसेसदेखील अपुर्‍या पडल्याचे चित्र दिसून आले. दुसरीकडे नाशिकमधून गावाकडे परतणार्‍या प्रवाशांच्या गर्दीमुळे नवीन सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकांमध्ये रविवारी सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती. तिकिट काढण्यासाठी लांबवर रांगा लागलेल्या होत्या. अन्य मार्गांच्या तुलनेत धुळे आणि पुणे मार्गांवर जादा बसेसची व्यवस्था असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

- Advertisement -
गेल्यावर्षीची दिवाळी कोरडी

कोरोनामुळे दोन वर्षे थांबलेली चाके आणि त्यानंतर म्हणजेच गेल्यावर्षी एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक भुर्देड सहन करावा लागला होता. यंदा मात्र सर्वच निर्बंध दूर झाल्याने प्रवाशांच्या तोबा गर्दीमुळे एसटी महामंडळाला चांगला आर्थिक महसूल प्राप्त होईल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांनी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -