घरमनोरंजन'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा झाला अपघात; रुग्णालयात करण्यात आलं दाखल

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारचा झाला अपघात; रुग्णालयात करण्यात आलं दाखल

Subscribe

90 च्या दशकातील प्रसिद्द बॉलिवूड अभिनेत्री रंभा बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रंभा हिचा कार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये रंभाच्या गाडीचा चक्काचूर झाली आहे. रंभाचा हा अपघात कॅनडामध्ये झाला आहे. हा कार अपघात झाला त्यावेळी कारमध्ये रंभा तिची मुलं आणि त्यांची आया देखील होती. दरम्यान, आता सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात

 

View this post on Instagram

 

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

- Advertisement -

अभिनेत्री रंभाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कार अपघाताबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये रंभाने कारचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये कारचा चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कारमध्ये बसलेल्या कोणालाच फार गंभीर दुखापत झालेली नाही. रंभाने फोटोखाली कॅप्शन देत लिहिलंय की, मुलांना शाळेत सोडायला जात असताना आमची कार दुसऱ्या कारला धडकली. यावेळी मी माझी मुलं आणि आया कारमध्ये होती. आम्ही सगळे आता सुरक्षित आहोत. आमच्यापैकी कोणालाही फार गंभीर दुखापत झालेली नाही. परंतु माझी लहान मुलगी साशा रुग्णालयात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमची प्रार्थना माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.

कोण आहे रंभा?
सध्या रंभा बॉलिवूड चित्रपटांपासून लांब आहे. परंतु 90 च्या दशकात रंभा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. रंभाने सलमान खानच्या जुडवा चित्रपटामध्ये काम केले होते. तसेच या चित्रपटाव्यतिरिक्त रंभाने ‘घरवाली बाहरवाली’, ‘क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’ या चित्रपटांमध्ये कान केले आहे. तसेच तिने तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

ही भूतनी कोण आहे? कतरीना कैफच्या हॅलोवीन लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -