घरपालघरबोईसरमध्ये अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा प्रश्न गंभीर

बोईसरमध्ये अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा प्रश्न गंभीर

Subscribe

वाहतूक पोलिसांसोबत एमआयडीसी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे.ग्रामपंचायतीने तर फक्त नो पार्कींगचे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बोईसर: बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांच्या बेकायदा पार्कींगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे.या बेकायदा पार्कींगमुळे दुचाकी आणि इतर लहान वाहनचालकांना अक्षरक्ष: जीव मुठीत घेऊन वाहने चालवण्याची कसरत करावी लागते’ बेकायदा पार्कींगच्या या प्रश्नाकडे आरटीओ, वाहतूक पोलिसांसोबत एमआयडीसी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे.ग्रामपंचायतीने तर फक्त नो पार्कींगचे फलक लावून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पोलाद,अभियांत्रीकी,औषधे,रासायनिक आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील जवळपास १२०० कारखाने असून दोन ते अडीच लाखांच्या संख्येत कामगार काम करीत आहेत.या कारखान्यांमध्ये कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी रोज हजारो ट्रेलर्स,कंटेनर्स,ट्रक्स आणि टँकर सारखी अवजड वाहनांची वाहतूक होत असते.या वाहनांच्या पार्कींगसाठी कायमस्वरूपी वाहन तळ नसल्याने ही अवजड वाहने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच बोईसर,सरावली या ग्रामपंचायत हद्दीतील नागरी क्षेत्र असलेल्या रस्त्यांवर तसेच बोईसर-चिल्हार या मुख्य मार्गावर खैरापाडा,बेटेगाव आणि मान या गावांच्या हद्दीत दोन्ही बाजूस बेकायदशीरपणे पार्कींग केली जातात.बोईसर रेल्वे स्टेशन येथे मालगाडीद्वारे बाहेरून आणला जाणारा तसेच पाठवला जाणारा माल वाहतूक करणारे अनेक अवजड ट्रेलर्स बोईसर पालघर रस्त्यावरील खैरापाडा साईबाबा मंदीरासमोर बेकायदा उभे केले जातात.
यामुळे रस्त्याची एक वाहिनी व्यापून उभ्या केलेल्या या अवजड वाहनांना रात्रीच्या अंधारात मागच्या बाजूने धडकून अनेक वेळा लहान वाहने आणि मोटारसायकल चालकांचे अपघात होत आहेत.आधीच या मुख्य रस्त्यांवरील पथदीवे अनेकदा बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या अंधारात वाहनचालकांवर अक्षरक्ष जीव मुठीत धरून प्रवास करण्याची पाळी येते.ऐरवी लहान सहान कारणांसाठी नियम मोडणार्‍या आणि वैध कागदपत्रे जवळ न बाळगणार्‍या दुचाकीचालक आणि प्रवासी वाहनांवर सातत्याने दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक पोलीस मात्र या ओवरलोड आणि बेकायदा पार्कींग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या तसेच अपघातास कारणीभूत अवजड वाहनांवर कारवाईसाठी डोळेझाक करतात.त्यामुळे करवाईत पक्षपाती होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी करीत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -