घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींनी मोरबी दुर्घटनाग्रस्त भागाची केली पाहणी; पीडितांना हवी ती मदत करण्याचे दिले निर्देश

पंतप्रधान मोदींनी मोरबी दुर्घटनाग्रस्त भागाची केली पाहणी; पीडितांना हवी ती मदत करण्याचे दिले निर्देश

Subscribe

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता केबल पूल कोसळल्याने 135 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळाची पाहणी करत दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील उपस्थित होते.

दरम्यान या दुर्घटनेत 100 हून अधिक जण जखमी झाले, ज्यांवर उपचार सुरु आहेत. मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या या जखमींची पंतप्रधानांनी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच पंतप्रधान मोदींनी अपघाताबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान मोदींनी आधिकाऱ्यांना अनेक सुचना केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या संपर्कात राहा, त्यांना या दु:खाच्या काळात सर्वतोपरी मदत मिळावी, त्यांना काय हवं नको ते बघा. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याबाबतही मोदींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या दुर्दैवी घटनेमुळे अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत उभं राहणं आपलं काम आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबतही माहिती दिली आहे.

जखमींची प्रकृती जाणून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. मोरबी दुर्घटनेबाबत ती बैठकही झाली. त्या बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. हा अपघात कसा झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. सध्या मोरबी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. याप्रकरणी 9 जणांना अटकही करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.


माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात अडथळा; लोको-पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अनर्थ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -