घरताज्या घडामोडीकोल्हापुरात 'लव्ह जिहाद'चा संशय, भाजपाच्या नितेश राणेंचे ठिय्या आंदोलन

कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’चा संशय, भाजपाच्या नितेश राणेंचे ठिय्या आंदोलन

Subscribe

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून 13 वर्षीय मुलगी बेपत्ता आहे. मुलगी बेपत्ता असल्याने वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय, यामागे लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून 13 वर्षीय मुलगी बेपत्ता आहे. मुलगी बेपत्ता असल्याने वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय, यामागे लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापुरातील या घटनेचा भाजपाने निषेध केला असून, भाजपा आमदार नितेश राणे ठिय्या आंदोलन करत आहेत. (minor girl missing in kolhapur 19 days suspicion of love jihad)

कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, पोलिस कारवाई करण्यात पोलिस दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय. या घटनेला 18 दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही. याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी जुना राजावाडा पोलिसांना याबाबत जाव विचारला आहे. या प्रकरणातील मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रकरण नाजूक असल्याने पोलिस काळजीपूर्वक तपास करत आहेत. तसेच, प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कोल्हापुरातील या घटनेप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी जन आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून नितेश राणे ठिय्या आंदोलन करत आहेत. तसेच, यावेळी त्यांनी या घटनेचा निषेध करत आपण जागृक कधी होणार आहात असा सवाल विचारला. शिवाय, किरण पावसकर आणि नितेश राणेही तुम्हाला कशाला लागतात. तसेच, जेव्हा आपण हिंदु म्हणून जागे होऊ तेव्हा असे धरणे द्यायची गरज भासणार नाही, असेही यावेळी नितेश राणे यांनी म्हटले.

“या राज्यातील सगळेच पोलीस सारखे नसतात, पण काही नालायक असतात. त्यामुळे त्यांना शिक्षाही मिळणारच हे आश्वासन यावेळी मी देतो. आज राज्यमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रिफ मंत्री नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. महाविकास आघाडीचे सरकार नाहीये. तुम्ही हिंदू म्हणून एकत्र या, हिंदू म्हणून तुमचा आवाज उठवा, पुढे तुम्हाला सुखरुप घरी कसे पोहोचवायचे हे नितेश राणे पाहून घेईल हेही मी याठिकाणी आश्वासन देतो. कारण तिकडे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. आज खरे हिंदूत्ववादी म्हणून गृहमंत्री पदावर बसलेले आहेत”, असेही राणेंनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – ट्विटरचे ‘ब्लू टिक’ दरमहा आठ डॉलरला; एलॉन मस्कची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -