घरमहाराष्ट्रआषाढी आणि कार्तिकीला पंढरपुरच्या विठ्ठलाची पूजा, देवेंद्र फडणवीस पहिलेच नेते

आषाढी आणि कार्तिकीला पंढरपुरच्या विठ्ठलाची पूजा, देवेंद्र फडणवीस पहिलेच नेते

Subscribe

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.

कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपुरात अनेक भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अशातच कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पण यात विशेष असे की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी आणि कार्तिकी एकादशीची पूजा करण्याचा मान मिळणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते आहेत. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. तर आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना कार्तिकी एकादशीच्या पुजेचा मानही मिळाला.

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. कार्तिकी यात्रेची एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान ”हा विलक्षण योग्य आहे असे फडणवीस म्हणाले”.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या शासकीय महापुजेत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी केले.

- Advertisement -

‘मंदिर 2023’ डायरीचे प्रकशन

पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर ‘मंदिर 2023’ डायरी चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्याचोबत विठ्ठल रुक्मिणी यांच्या अलंकारांच्या अल्बमचेही प्रकाशन झाले. रात्री बारा वाजता विठुरायाच्या नित्यपूजेसदेखील सुरुवात झाली. यानंतर विठ्ठलाची पाद्यपूजा करण्यात आली. या पूजेवेळी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर दर्शन पुन्हा सुरु करण्यात आले.


हे ही वाचा –  कार्तिकी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रासाठी विठुरायाकडे साकडे

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -