तुळशी विवाह पार पडताच सुरू होणार लग्नकार्य; जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील मुहूर्त

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं. या वर्षी देवउठनी एकादशी शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 रोजी असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू जवळपास 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात. तसेच मागील चार महिन्यांपासून जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरु होतील. सोबतच देवउठनी एकादशी पासून लग्नसोहळ्या सारखे मांगलिक कार्य देखील सुरु होतील.

परंतु तुळशी विवाहानंतर लगेच लग्नाचे मुहूर्त असणार नाहीत कारण, या काळात शुक्र ग्रह अस्त आहे. येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत ते अस्त असतील. तो पर्यंत कोणताही लग्न मुहूर्त नसेल.

नोव्हेंबरमध्ये असणार 4 लग्नाचे मुहूर्त
तुळशी विवाहानंतरचा पहिला शुभ मुहूर्त सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी असणार आहे. त्यानंतर गुरुवार, 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर हे चार विवाह मुहूर्त नोव्हेंबरमध्ये असणार आहेत.

डिसेंबरमध्ये असणार 5 लग्नाचे मुहूर्त
डिसेंबरमधील पहिला शुभ मुहूर्त शुक्रवार 2 डिसेंबर रोजी असेल. त्यानंतर 7, 8, 9, 14 डिसेंबर हे आहेत.

 


हेही वाचा :

तुळशी विवाहाचा काय आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या पूजाविधी