घरमहाराष्ट्रकार्तिकी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रासाठी विठुरायाकडे साकडे

कार्तिकी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रासाठी विठुरायाकडे साकडे

Subscribe

विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

हरिनामाचा जप करत आज कीर्तिकी एकादशीनिमित्त (kartiki ekadshi) हजारो वारकरी पंढरपुरात श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी पांढरपुरच्या विठुराया चरणी साकडे घातले आहे.” देशाचा मानबिंदू असणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकत राहू दे.

महाराष्ट्राचा अन्नदाता असलेला शेतकरी राजा, कष्टकरी, मेहनती आणि उद्यमी बांधवांच्या आयुष्यासुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्लाकडे कडे केले. विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांच्या हस्ते श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. तर यावर्षी मनाचे वारकरी म्ह्णून औरंगाबाद मधील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील गावी राहणारे उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.

आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( dcm devendra fadanvis) यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रक्मिणीची महापूजा केली. यावेळी विठुरायाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर मंत्रोपचाराने विठूरायाची यथासांग पूजा संपन्न झाली. मागील 50 वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले असून मागील 50 वर्ष ते पंढरीची वारी करीत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा –   उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली पंढरपुरात विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -