घरमनोरंजनआलिया भट्ट लेकीचं ठेवणार 'हे' नाव, पटापट वाचा

आलिया भट्ट लेकीचं ठेवणार ‘हे’ नाव, पटापट वाचा

Subscribe

बॉलिवूडची स्वीट अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच एका गोंडस मुलीची आई झाली. आलियाने 6 नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. आलिया आणि तिच्या लेकीची प्रकृती सध्या उत्तम आहे. आलियाला मुलगी झाल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर सध्या तिच्यावर आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आलियाच्या लेकीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशात आलिया तिच्या लेकीचं नाव काय ठेवेल याबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत. अशात आलिया भट्टचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात आलिया तिच्या मुलीचं नाव काय ठेवणार याबाबत खुलासा केला होता. वर्षाभरापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. (alia bhatt revealed she wanted to name her daughter this watch video)

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सुपर डान्सर सीझन 3 या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये आलियाने मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवणार हे सांगताना दिसली. एका स्पर्धकाने मुलीचं नाव काय ठेवणार असं विचारल्यानंतर आलियाने नावाचं स्पेलिंग सांगितले होते. आलियाने लिहिलेली स्पेलिंग त्या स्पर्धकाने चुकीची वाचली. मात्र आलियाला ती चुकीची स्पेलिंग देखील खूप आवडली. आलिया यावर म्हटले की, ‘ए एल एम ए ए (ALMAA) अर्थात अलमा… अलमा हे अतिशय सुंदर नाव आहे. जर मला मुलगी झाली तर तिचं नाव मी अलमा असंच ठेवेन.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

मात्र आलिया आता खरचं तिच्या लेकीचं नाव अलमा ठेवणार की नाही हे लवकरचं कळेल. मात्र सध्या कपूर कुटुंबामध्ये छोट्या परीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण आहे. रणबीर सिंह आणि त्याची आई आणि आजी नीतू कपूर तर प्रचंड आनंदित आहेत. आजी झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

- Advertisement -

आलियाने 6 नोव्हेंबरला मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरने एका नोटद्वारे मुलीच्या जन्माची घोषणा केली. मुलीच्या जन्माबाबत आलियाने लिहिले की, “आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी. आमची मुलगी आली आहे.. ही जादुई मुलगी आहे.”


रविना टंडनच्या मुलीचा ब्यूटीफुल लूक; पाहा फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -