घरमहाराष्ट्रबालविवाह रोखण्यासाठी बीडच्या मुलीचा भारत जोडो यात्रेत सहभाग

बालविवाह रोखण्यासाठी बीडच्या मुलीचा भारत जोडो यात्रेत सहभाग

Subscribe

आमचा भाग दुष्काळी आहे आणि त्यामुळे तिथे ऊसतोड कामगार जास्त आहेत. उसतोडीला जाताना सोबत मुलींना घेऊन न जाता त्यांचे कोवळ्या वयात लग्न करून आई-वडील मोकळे होतात

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत अनेकजण जोडले गेले आहेत. अशातच एका मुलीने राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बालविवाहाचे वाढते प्रमाण रोखण्यात यावे याच विषयावर सारिका पाखरे हिला राहुल गांधी यांच्याशी बोलायचे आहे.

मी लहान असताना माझ्या मामांनी माझा विवाह निश्चित केला. त्यावेळी मला शिकण्याची इच्छा असूनही माझ्या मामांनी माझा विवाह निश्चित केला. मी अनेकदा विनवण्या केल्या पण कोणीच माझे ऐकले नाही. तेव्हा मी धाडस केले आणि ‘लेक लाडकी’ (lek ladki) या संस्थेच्या मदतीने लग्न थांबविले. पण माझ्या जिल्ह्यात मात्र बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आणि देशात सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि म्हणूनच मला राहुल गांधी यांच्याशी बोलायचे आहे. असे सारिका पाखरे हिने सांगितले. सारिकाचे वय 17 असून ती बीड जिल्ह्यातील मानूर मध्ये राहते.

- Advertisement -

नांदेडजवळील (nanded) दाभड येथून शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास भारत जोडो यात्रा सुरू झाली. या यात्रेत सातारा येथील ‘लेक लाडकी’ या संस्थेच्या प्रमुख वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्य सारिका पाखरेसोबत चालत होते. एकता, अखंडता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या बॅनरचे जॅकेट घालून ते सर्वजण चालत आहेत. महाराष्ट्रात पुढील नऊ दिवस भारत जोडो या यात्रेत ते सहभागी असतील.

bharat joso yatra

- Advertisement -

ग्रामीण भागात रोजगार संधी हव्यात
सारिका पाखरे (sarikha parakhre) म्हणते, ‘आमचा भाग दुष्काळी आहे आणि त्यामुळे तिथे ऊसतोड कामगार जास्त आहेत. उसतोडीला जाताना सोबत मुलींना घेऊन न जाता त्यांचे कोवळ्या वयात लग्न करून आई-वडील मोकळे होतात,’ अशी व्यथा सारिकाने मांडली. ज्या प्रमाणे मी माझा बालविवाह रोखला त्याप्रमाणे माझ्या दोन मैत्रिणींचे बालविवाहसुद्धा मी रोखले आहेत. पण ही प्रथा कायमस्वरूपी रोखण्यासाठी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची गरज आहे. ही माझीच नाही तर हजारो लेकींची व्यथा आहे आणि तीच मला राहुल गांधींना सांगायची आहे. असे सारिका म्हणाली.

दोन‌ मिनिटांची कोपरा सभा
हिंगोली मधील वारंगा फाटा येथे शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोपरा सभा झाली. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. पण, राहुल गांधी हे दोन मिनिटेच बोलले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राजीव सातव आज आपल्यात नाहीत. त्यांची आठवण येते आहे’ असे राहुल गांधी म्हणाले.


हे ही वाचा – शिंदे गटातील प्रवेशानंतर गजानन कीर्तिकरांची ठाकरे गटाकडून पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -