घरमनोरंजनमहेश बाबू यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन

महेश बाबू यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन

Subscribe

आईच्या जाण्याच्या दुःखातून सावरत नसतानाच वडिलांचीही माया हरपल्याने महेश बाबू सध्या इमोशनल ट्रॅजिडीतून जात आहेत. महेश बाबू यांच्या पालकांशी फार कनेक्टेड होते.

साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. कृष्णा घट्टामनेनी यांनी वयाच्या ७९ व्या अखेरचा श्वास घेतला. कृष्णा घट्टामनेनी सुद्धा तेलुगूचे प्रसिद्ध अभिनेते होते. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

कृष्णा घट्टामनेनी यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही कृष्णा घट्टमनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची त्यांनी आठवण करून दिली. तसंच, कृष्णा यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

दोनच महिन्यांपूर्वी महेश बाबू यांच्या आईचं निधन झालं होतं. आता त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने महेश बाबू यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या जाण्याच्या दुःखातून सावरत नसतानाच वडिलांचीही माया हरपल्याने महेश बाबू सध्या इमोशनल ट्रॅजिडीतून जात आहेत. महेश बाबू यांच्या पालकांशी फार कनेक्टेड होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच आपल्या आई-वडिलांचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -