घरमनोरंजनईशाच्या लग्नाला अॅश-अभिचा रोमँटिक परफॉर्मन्स

ईशाच्या लग्नाला अॅश-अभिचा रोमँटिक परफॉर्मन्स

Subscribe

सध्या ईशा आणि आनंद लग्नाचे प्री वेडिंग कार्यक्रम सुरु आहेत. अंबानी आणि बच्चन कुटुंबियांचे खूप जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अॅश- अभि ईशाच्या लग्नात काहीतरी हटके करणार हे माहीत होते.

ज्या सिनेमातून ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रेमाला वेगळे वळण मिळाले. त्याच सिनेमाच्या रोमँटिक ट्रॅकवर बहादार नृत्य सादर करत ईशा आणि आनंदच्या प्री-वेडींग सोहळ्याला अॅश- अभिच्या जोडीने चार चांद लावले. ‘गुरु’ या सिनेमातील ‘तेरे बिना’ या गाण्यावर दोघांनी रोमँटिक नृत्य सादर केले आणि अनेकांची मने जिंकून घेतली. ईशा आणि आनंद यांचा विवाहसोहळा १२ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणार आहेत. तर त्यांचा प्री- वेडिंग सोहळा हा शनिवारी रात्री उदयपूर येथे पार पडला. आता ईशा- आनंदची लग्नघटीका जवळ आली असून  हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील कलाकार खास लग्नासाठी अंबानी यांच्याकडे येऊ लागली आहे.

वाचा- ईशाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून ‘अन्न सेवा’

अॅश अभिचा अनोखा अंदाज

सध्या ईशा आणि आनंद लग्नाचे प्री वेडिंग कार्यक्रम सुरु आहेत. अंबानी आणि बच्चन कुटुंबियांचे खूप जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अॅश- अभि ईशाच्या लग्नात काहीतरी हटके करणार हे माहीत होते. अॅश आणि अभिने खास ईशाच्या लग्नासाठी त्याच्याच एका सिनेमातील गाण्यावर नृत्य सादर केले. ऐश्वर्याने पांढऱ्या रंगाची लेहंगा- चोळी घातली होती. ज्यावर गुलाबी रंगाचे थ्रेडवर्क आणि काजकाम करण्यात आले होते. तर अभिषेक लाल कलरच्या कुर्तीमध्ये दिसला. विशेष म्हणजे खूप वर्षानंतर या दोघांनी एकत्र स्टेज शेअर केला आहे.

वाचा-ईशा अंबानीच्या लग्नासाठी सेलिब्रिटींची हजेरी

पाहा व्हिडिओ

- Advertisement -

१० वर्षांनी दिसणार एकत्र

अभि- अॅश गुरु सिनेमानंतर पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. पण त्यांच्या फॅनसाठी आनंदाची बातमी अशी की ही जोडी पुन्हा एकदा ‘गुलाबजामुन’ या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आता गुलाबजामुन हा सिनेमा कसा असणार अशी उत्सुकता त्यांच्या फॅन्सलादेखील लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -