घरदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीत उतरणार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी चुरस वाढणार

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीत उतरणार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी चुरस वाढणार

Subscribe

काहीच दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की थोड्याच दिवसांत ते एक मोठी घोषणा करणार आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत उभे राहणार असल्याने ते पुन्हा निवडून येतील का हे पाहावं लागणार आहे.

वॉशिंग्टन –  अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former President Donald Trump) यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (President Election) ते पुन्हा उभे राहणार आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणून सिद्ध होईल.

हेही वाचा – राम मंदिराचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? अमित शाहांकडून मोठा खुलासा

- Advertisement -

२०१६ च्या निवडणुकीत ट्रम्प निवडून आले होते. रिपब्लिकन पक्षातील नेते डोनाल्ड ट्रम्प यांना अद्यापही अनेकांचं समर्थन आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसच्या निवडणुकीसाठी ते सज्ज झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ च्या निवडणुकीत चांगली मुसंडी मारली होती. मात्र, २०२० च्या निवडणुकीत त्यांना हार पत्कारावी लागली. हे अपयश अद्यापही डोनाल्ड ट्रम्प यांना पचवता आलेलं नाही. त्यामुळे ते येत्या निवडणुकीत पुन्हा अधिक जोमाने उभे राहणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पोलंडमध्ये पडली रशियाची क्षेपणास्त्र; बायडेन यांनी तातडीने बोलावली G7 देशांची बैठक

काहीच दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की थोड्याच दिवसांत ते एक मोठी घोषणा करणार आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत उभे राहणार असल्याने ते पुन्हा निवडून येतील का हे पाहावं लागणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -