घरमहाराष्ट्रराष्ट्रगीताऐवजी दुसरेच गाणे वाजले; राहुल गांधींच्या सभेतील व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रगीताऐवजी दुसरेच गाणे वाजले; राहुल गांधींच्या सभेतील व्हिडीओ व्हायरल

Subscribe

जेव्हा चुकीचं गाणं वाजतंय हे लक्षात आल्यावर राहुल गांधी यांनी तात्काळ मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांना रोखले आणि राष्ट्रगीत लावायला सांगितले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi)  भारत जोडो यात्रेवर आहेत (bharat jodo yatra). सध्या ही पदयात्रा महाराष्ट्रातील वाशिममध्ये आहे. या वेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते तिथे उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रगीताऐवजी दुसरे गाणे लागले त्यामुळेच आता राहुला गांधी यांच्यावर टीकेला सुरुवात झाली आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातल्या वाशिममध्ये (washim) असताना. त्यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसचे (congress) इतर नेते मंचावर उपस्थित होते. दरम्यान सभा सुरु असताना. राहुल गांधी यांनी राष्ट्रगीत लावायला सांगितले. पण त्यावेळी चुकून दुसरेच गाणे वाजले. जवळपास पाच दहा सेकंद राहुल गांधी यांच्यासह काही नेते मंचावर सावधान स्थितीत उभे होते. पण जेव्हा चुकीचं गाणं वाजतंय हे लक्षात आल्यावर राहुल गांधी यांनी तात्काळ मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांना रोखले आणि राष्ट्रगीत लावायला सांगितले.

- Advertisement -

पण मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांच्या ही गोष्ट उशिरा लक्षात आली आणि अखेर गाणे बंद करण्यात याच घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान भाजपचे नेते नितेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे. राजकारणात नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्यासाठी संधी शोधत असतात. अशातच नितेश राणे (nitesh rane) यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर टीका करत आहेत. यावरूनच नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली तर राष्ट्रगीताचा अपमान केला असा आरोप केला.

- Advertisement -

हे ही वाचा – राहुल गांधींच्या सावरकरांविरोधी वक्तव्याशी सहमत नाही, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -