घरक्राइमधक्कादायक! मुंबईत प्रेयसीला इमारतीच्या टाकीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

धक्कादायक! मुंबईत प्रेयसीला इमारतीच्या टाकीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

Subscribe

वसईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने अवघ्या देशाला हादरवून टाकले असताना, मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील बोरिवली भागात एका प्रियकारने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित प्रेयसीच्या वडिलांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. अमेय दरेकर असं आरोपी प्रियकराचे नाव असून तो बोरिवली परिसरातील रहिवासी आहे. आरोपीला मुंबईतील न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमेय दरेकर आणि पीडित तरुणी एकमेकांना सुमारे 10 वर्षांपासून ओळख असून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. रविवारी रात्री पीडित प्रेयसी आपला प्रियकर अमेय दरेकर याला भेटण्यासाठी रविवारी रात्री बोरिवली येथील त्याच्या निवासस्थानी गेली. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादानंतर संतापलेल्या आरोपी प्रियकराने पीडित प्रियसीला इमारतीच्या पाण्याच्या टाकीवरून धक्का देत ढकलून दिले. यामुळे अंदाजे 18 फूट खाली पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेवेळी दोघांनीही मद्यपान केले होते. पीडित प्रेयसीच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.

- Advertisement -

अशा अवस्थेतही दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी अमेय आणि त्याच्या आईने पीडित प्रेयसीला तिच्या आई- वडिलांकडे नेऊन सोडले. यानंतर पीडित प्रेयसीच्या वडिलांनी याप्रकरणी आरोपी प्रियकरावर दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र ही घटना दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण आता दहिसर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

दहिसर पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा : गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचाराची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -