घरदेश-विदेशडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे देशातील पहिले स्त्रीवादी पुरुष होते, शशी थरुर यांचं मत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे देशातील पहिले स्त्रीवादी पुरुष होते, शशी थरुर यांचं मत

Subscribe

नवी दिल्ली – डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतातील पहिले स्त्रीवादी पुरुष होते. आपले स्पष्ट विचार व्यक्त करण्याचा एक असाधारण दृष्टीकोन त्यांच्याकडे होता. त्यांनी काही मुद्दे तेव्हा उचलले जेव्हा हे मुद्दे अस्तित्वातच नव्हते. स्वातंत्र्यसंग्रामातून लक्ष हटवण्याकरता दलितांचा मुद्दा उपस्थित केला जातोय, असं जेव्हा सवर्णांना वाटत होतं, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दलितांसाठी लढा सुरू केला होता, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटलंय. आंबेडकर: अ लाईफ या पुस्तकात शशी थरुर यांनी असं म्हटलं आहे.

लग्न, गरोदरपणा या विषयांवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगभर ऐकवले जातात. दूरदृष्टी असलेला इसम ८९-९० वर्षांपूर्वी महिलांच्या अधिकारांसाठी बोलतो, त्यांच्या हक्कांचा विचार करतो. ही अत्यंत असाधारण गोष्ट आहे, असं शशी थरूर म्हणालेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक सुट्ट्यांसाठी विचार मांडला होता. तसंच, पुरुष कामगारांप्रमाणेच स्त्रीयांनाही रोजंदारी मिळावी याकरता त्यांनी मोठा लढा लढला होता. १९८३ साली आंबेडकर यांनी महिलांसाठी एक विधायक पास करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी निधीद्वारे बर्थ कंट्रोल अभियान चालवण्याची योजना होती. मात्र, हा प्रस्ताव अनैतिक असल्याचं सांगत नाकारण्यात आला, अशीही नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -