घरमहाराष्ट्रमोदींना हात जोडून विनंती; राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया

मोदींना हात जोडून विनंती; राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे वभाव आहेत आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसं शकतं. यांना अजून राज्यपाल पदी कसं ठेवलं जातं? असा प्रश्न विचारत संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल भागात सिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) हे नेहमीच काही न काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात. अशातच कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं वक्तव्य करत राज्यपाल कोश्यारी यांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावरच आता राज्यपालांना महाराष्ट्रा बाहेर काढा असं म्हणत संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje chhatrapati) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे सातत्याने अशी बडबड का करतात? हा प्रश्न मला पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र (pn narendra modi) मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे वभाव आहेत आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसं शकतं. यांना अजून राज्यपाल पदी कसं ठेवलं जातं? असा प्रश्न विचारत संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला.

राज्यपाल केश्यारी नेमकं काय म्हणाले?

- Advertisement -

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, तुम्हाला कुणी विचारले की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.

दरम्यान याआधी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या विरुद्ध सुद्धा बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरूनही मोठया प्रमाणात वादंग झाला होता अशातच राज्यपालांनी आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फुटले आहे.


हे ही वाचा – रांगोळीचा सडा, फुलांची उधळण; शेगावमध्ये ‘भारत जोडो यात्रे’चे जंगी स्वागत

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -