घरताज्या घडामोडीपुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, कंटेनरची अनेक वाहनांना धडक

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, कंटेनरची अनेक वाहनांना धडक

Subscribe

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये किमान 30 गाड्यांचे नुकसान झाले आहे. कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यामध्ये सुमारे 25 ते 26 गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींवर येथील जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर 25 ते 30 गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते या अपघाता प्रकरणी चौकशी करत आहेत.

- Advertisement -

अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाल्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली. या अपघातात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. परंतु या अपघातामध्ये अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


हेही वाचा : न्याययंत्रणा तुम्ही बुडाखाली घेणार असाल तर… उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -