घरताज्या घडामोडीनासाची ओरिअन कॅप्सुल थेट चंद्रावर; तब्बल 50 वर्षांनंतर ऐतिहासिक नोंद

नासाची ओरिअन कॅप्सुल थेट चंद्रावर; तब्बल 50 वर्षांनंतर ऐतिहासिक नोंद

Subscribe

50 वर्षांपूर्वी नासाच्या 'अपोलो' हे यान चंद्रावर पाठवलं होतं, त्यातून निल आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर आता ओरिअन कॅप्सूलने चंद्राला भेट दिल्याची ही पहिलीच वेळ आहे.

वॉशिंग्टन : नासाची ओरियन कॅप्सूल आज चंद्रावर पोहोचली. चंद्राच्या मागच्या बाजूने फेरी मारत या कॅप्सूलने चंद्राच्या कक्षेत विक्रमी 80 मैलांचं अर्थात 128 किमी अंतर कापलं. पृथ्वीपासून 232,000 मैलपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या चंद्राच्या मागून कॅप्सूल बाहेर येईपर्यंत ह्यूस्टनमधील फ्लाइट कंट्रोलर्सना अर्ध्या तासांचं कम्युनिकेशन ब्लॅकआउट पहायला मिळाले.

हे ही वाचा – राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या मेधा पाटकरांवरील टीकेला काँग्रेसचे चोख उत्तर

- Advertisement -

दरम्यान 50 वर्षांपूर्वी नासाच्या ‘अपोलो’ हे यान चंद्रावर पाठवलं होतं, त्यातून निल आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर आता ओरिअन कॅप्सूलने चंद्राला भेट दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. या कॅप्सूलने फ्लोरिडाच्या केनेडी या अवकाश प्रक्षेपण केंद्रातून गेल्या बुधवारी ब्लास्टिंग केलं होतं, त्यानंतर काही हजार मैलांवर जाऊन ते बंद करण्यात आलं होतं. त्यावेळी पहाटे घेतलेल्या व्हिडीओत चंद्र खूप मोठा दिसत होता.

पृथ्वीपासून सुमारे 2,50,000 मैल अंतरावर अपोलो 13 यानं सन 1970 मध्ये पोहोचलं होतं. परंतु आता ओरियन कॅप्सूल पृथ्वीपासून सुमारे 2,70,000 मैल अंतरावर पोहोचली आहे. त्यामुळे या झेपेमुळे ऐतिहासिक नोंद झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : रेल्वेच्या मेगा ब्लॉकमध्येही 20 हजार पर्यटकांची राणी बागेला भेट, प्रशासनाला 9 लाखांचे


 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -