घररायगडशिवप्रभूंच्या वादग्रस्त विधानप्रकरणी राज्यपालांविरोधात आंदोलन

शिवप्रभूंच्या वादग्रस्त विधानप्रकरणी राज्यपालांविरोधात आंदोलन

Subscribe

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात उरणमध्ये शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर अणि उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात कोश्यारी आणि खासदार त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

 

उरण: हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात उरणमध्ये शिवसेनेने आक्रमक
पवित्रा घेत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर अणि उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात कोश्यारी आणि खासदार त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
या वेळी गटनेते गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, दीपक भोईर, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील,द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर,माजी नगरसेवक निलेश भोईर, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड,वंदना पवार, मनीषा ठाकूर, मुमताज भाटकर,सायरा खान, लता राठो, कल्पना लोळगे, विभागप्रमुख गणेश शेलार,वैभव करंगुटकर, वाहतूक सेनेचे धीरज बुंदे, अल्पसंख्याक सेलचे एजाज मुकादम, नागाव सरपंच सी के गायकवाड, केगाव सरपंच आशिष तांबोळी, सोनारी उपसरपंच मेघशाम कडू,शाखाप्रमुख दिनेश पाटील, शैलेश भोईर,शेखर पडते, नियाज भाटकर, मोहम्मद शेख, संदीप चव्हाण तसेच तालुक्यातील शिवसेनेचे अनेक आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

पेणमध्ये तहसीलदारांना निवेदन सादर

श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि खासदार सुधांशु त्रिवेदी यांचा शहरातील विविध प्रकारच्या शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला आणि त्याबाबतचे निवेदन तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना तहसिल कार्यालयात जाऊन दिले.
कोश्यारी करत असल्याचा आरोप करत तसेच महाराजांबाबत वारंवार एकेरी उल्लेख करून त्यांची तुलना ही सामान्य व्यक्तींच्या सोबत केली जात असल्याचा आरोप शिवप्रेमी संघटनांनी केला आहे. असे बेताल वक्तव्य वारंवार हेतू पुरस्कार तर होत नाही ना याची राज्य सरकारने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि महाराष्ट्राला नवीन राज्यपाल देण्यात यावा, अशी मागणी करतानाच, आमच्या राजाचा अपमान करणार्‍या आमच्या राजाचा इतिहासही माहीत नसलेल्या या कोश्यारींना राज्यातून कायमचे हाकलून द्यावे अशा प्रकारची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे
जर अशाच घटना अशीच वक्तव्य होत राहिली तर विनाकारण महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण पसरवण्यास हेच राज्यपाल जबाबदार असतील असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे.स्वराज्य संघटना, स्वराज्य प्रतिष्ठान,सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, पेण मैत्री ग्रुप, शिवतेज मित्र मंडळ,शब्दभेदी सामाजिक संस्था तसेच समस्त शिवप्रेमी एकत्र येऊन आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण शहरातून निषेध रॅली काढली आणि अखेरीस तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

- Advertisement -

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे समस्त शिवप्रेमींची मने दुखावली गेली आहेत. राज्याच्या बाहेरून येणार्‍या माणसांना शिवाजी महाराज कधीच कळले नाहीत. त्यामुळे त्यांना राज्यामध्ये राहण्याचा आणि महाराष्ट्रातील पदे भूषविण्याचा काहीही अधिकार नाही. राज्य सरकारने या वक्तव्याची चौकशी करावी.

मंगेश दळवी,
माजी सरपंच – कामार्ली

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -