घरठाणेठामपाच्या कंत्राटी कामगारांचे महापालिकेवर आंदोलन

ठामपाच्या कंत्राटी कामगारांचे महापालिकेवर आंदोलन

Subscribe

पुन्हा सेवेत घेण्याची केली मागणी

एकीकडे मागील आठ ते नऊ वर्षे फायलेरीया विभागात काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना अचानक कमी केले. तर दुसरीकडे त्या कमी केलेल्या कामगारांच्या जागी नव्याने कामगार भरती केली. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सांयकाळी या कर्मचार्‍यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले.

कमी केलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत पुन्हा घेण्याबरोबर मागील नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याबरोबरच समान काम समान वेतन द्या अशी मागणी लावून धरली. तसेच पुढील 15 दिवसात यावर निर्णय झाला नाहीतर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

- Advertisement -

शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देण्यात आले असून त्यानुसार त्यांनी देखील कामगारांचे म्हणने ऐकूण घेतले असून यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र पुढील 15 दिवसात यावर योग्य निर्णय आला नाही तर मात्र पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -