घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआधारतीर्थ आश्रम खूनप्रकरण : आलोकच्या हत्येचे पोलिसांना सापडले धागेदोरे

आधारतीर्थ आश्रम खूनप्रकरण : आलोकच्या हत्येचे पोलिसांना सापडले धागेदोरे

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षीय चिमुकल्याचा खून करणार्‍याचा नाशिक ग्रामीण पोलिसांना सुगावा लागला आहे. संशयित आरोपीने चिमुकल्याचा खून कोणत्या कारणातून केला, त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागली असून, लवकरच आलोकच्या खूनमागील घटनेचा पोलिसांना उलगडा करणार आहेत.

आधारतीर्थ आश्रमात आलोक व त्याचा भाऊ आयुश (वय ११) राहत होते. सोमवारी रात्री आश्रमातील सर्व विद्यार्थी एकाच खोलीत झोपले होते. मंगळवारी सकाळी सहा वाजता आश्रमात घंटा वाजवण्यात आली. त्यावेळी सर्व मुले जागी झाली पण आलोक जागा झाला नाही. आश्रमातील मावशींनी आलोकला पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता आलोकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये आलोकचा गळा आवळ्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

- Advertisement -

आधारतीर्थ आश्रमामध्ये चार वर्षीय आलोक विशाल शिंगारेचा गळा आवळ्याचे समजताच नाशिक ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदन अहवालात आलोकचा खून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी आधारतीर्थ आश्रमाची पाहणी केली असता आश्रमात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याचे समोर आले. शिवाय, आश्रमात सुरक्षारक्षकच नसल्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी सांगितले.

तळवाडेमध्येच अंत्यसंस्कार

आलोकचा मृत्यू झाल्याने आणि उल्हासनगरमध्ये कोणीही नातेवाईक नसल्याने त्र्यंबकेश्वरमध्येच अंत्यविधी करा, असे आलोकच्या आईने पोलिसांना सांगितले. त्यानुसार आलोकच्या आई व आजीच्या उपस्थितीत आलोकच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२२) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले, असे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -