घरक्रीडाArgentina vs Mexico: मेस्सीला शिवीगाळ केल्याने अर्जेंटिना-मेक्सिकोच्या चाहत्यांमध्ये हाणामारी

Argentina vs Mexico: मेस्सीला शिवीगाळ केल्याने अर्जेंटिना-मेक्सिकोच्या चाहत्यांमध्ये हाणामारी

Subscribe

यंदाचा फिफा विश्वचषक २०२२ कतारमध्ये सुरू असून आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्व फुटबॉलप्रेमींकडून या फिफा विश्वचषकाला चांगला प्रतिसाद मिळतोय. असे असतानाच या विश्वचषकाला गालबोट लागले आहे.

यंदाचा फिफा विश्वचषक २०२२ कतारमध्ये सुरू असून आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्व फुटबॉलप्रेमींकडून या फिफा विश्वचषकाला चांगला प्रतिसाद मिळतोय. असे असतानाच या विश्वचषकाला गालबोट लागले आहे. अर्जेंटिनाच्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी दोहा येथील अल विद्दा पार्कमध्ये अर्जेंटिना आणि मेक्सिको संघाच्या चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला. ही घटना अल विड्डा पार्कच्या फॅन्स झोनमध्ये घडली. (Argentina vs Mexico Argentina Mexico fans clash after abusing Messi)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

फिफा वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना २२ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाने २-१ असे पराभूत केले. या पराभवानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. अर्जेंटिनाच्या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी दोहा येथील अल विद्दा पार्कमध्ये अर्जेंटिना आणि मेक्सिको संघाच्या चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला.

मेक्सिको संघाचे चाहते एक व्हिडिओ बनवत होते, ज्यामध्ये ते मेस्सीला शिवीगाळ करत होते. हे ऐकल्यानंतर मेस्सीचे चाहते संतापले आणि दोन्ही गटात जोरदार राडा झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाचा सामना आज रात्री १२.३० वाजता मेक्सिकोशी होणार आहे. राऊंड ऑफ १६ मध्ये पोहोचण्यासाठी अर्जेंटिनाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्यातील सामना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात होणार आहे.


हेही वाचा – IND vs NZ: कर्णधार शिखर धवनचा मोठा विक्रम; विराट-धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -