घरठाणेजिल्हा रुग्णालयाची जागा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसाठी

जिल्हा रुग्णालयाची जागा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसाठी

Subscribe

अपघात विभागासह शवागृह तात्पुरते होणार स्थलांतरित, वागळे इस्टेट येथे तात्पुरते जिल्हा रुग्णालय

ठाणे । ठाणे विठ्ठल सायन्ना जिल्हा (शासकीय) रुग्णालयाचे रुपडे लवकरच पालटणार असून या रुग्णालयाचे रूपांतर 900 बेड्ससह एअर रुग्णवाहिका उतरविण्यात येईल अशा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात होणार आहे. यासाठी सुरुवातीला ज्या काही जीर्ण झालेल्या इमारती आणि नर्सिंग प्रशिक्षणर्थी इमारत पडून नव्या बांधकामाचा श्रीगणेशा केला जाणार होता. मात्र, आता रूग्णालयाच्या आवारातील अपघात विभागाच्या इमारतसह शवागृह आदी बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. याच्यामुळे आता संपूर्ण जिल्हा रुग्णालय वागळे इस्टेट येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राजवळील शासकीय जागेत लवकरच स्थलांतरित होणार आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत ही स्थलांतरित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी महिन्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला मुहूर्त केव्हा मिळणार याची उत्कंठा गेल्या काही महिन्यांपासून ठाणेकरांना होती. परंतु आता ही उत्कंठा जवळजवळ संपली आहे. रुग्णालयाच्या बांधकामाचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. थोड्या विलंबाने का होईना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निविदेचे काम ही अंतिम टप्प्यात येऊ थांबले आहे. परंतु रुग्णालयाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी येथील काही रुग्ण विभाग वागळे इस्टेट येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राजवळील शासकीय जागेत स्थलांतरित होणार आहेत.

- Advertisement -

रुग्णांच्या सोयीसाठी मनोरुग्णालया जवळील जागेत रुग्णसेवा देतेवेळी कोणत्या अडचणी नाहीत ना याची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडून करण्यात आली. तर सुपर स्पेशालिटी रुग्णालय करून, 200 सुपर स्पेशालिटी बेड, 200 महिला, लहानमूल, डिलिव्हरी साठी तर 500 बेड जनरल अशा 900 खाटांचे रुग्णालय होत असताना, सिव्हिल रुग्णालयातील डिलिव्हरी वॉर्ड, लहान मुलांचा अतिदक्षता विभाग, कुपोषित बालकांचे सेंटर, नेत्रविभाग, ब्लडबँक, प्रयोगशाळा, किचन, अपघात विभाग, शवागृह आदी विभाग मनोरुग्णालया जवळील तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शासकीय इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहेत. तर सिव्हिल रुग्णालयात सर्जरी, ऑर्थो, इएनटी, फिजिओथेरपी, अपघात विभाग, आयुष आदी विभाग कार्यरत रहाणार आहेत.

पुढच्या काही दिवसात जिल्हा रुग्णालयाच्या जागी तीन बेसमेंट आणि दहा मजली बांधकाम असणार्‍या दोन भव्य इमारतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. या आधी जिल्हा रुग्णालयातील जुन्या व जीर्ण झालेले बांधकाम तोडण्यापूर्वी येथील काही रुग्ण विभाग येत्या दीड ते दोन महिन्यांत स्थलांतरित होईल. यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हे स्थलांतर पूर्ण झाल्यावर लवकर नव्या रुग्णालयाच्या बांधकामाचा श्रीगणेशा होईल असा विश्वास रुग्णालय सूत्रांमार्फत वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

सुरुवातीला अपघात विभाग इमारतीसह शवागृह ही हे त्या ठिकाणी तसेच ठेवून उर्वरित जीर्ण इमारत पडण्यात येणार होत्या. मात्र आता ते बांधकामही पाडण्यात येणार आहे. 900 बेड्सचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहिपर्यंत हे रुग्णालयात वागळे इस्टेट येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राजवळील शासकीय जागेत स्थलांतरित केले जाणार आहे. येथे येणार्‍या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी व खबरदारी रूग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे.
– डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -