घरताज्या घडामोडीभारताला जी-20 चं अध्यक्षपद मिळताच पीएम मोदींचा नवा अजेंडा, परराष्ट्र मंत्र्यांनीही दिला...

भारताला जी-20 चं अध्यक्षपद मिळताच पीएम मोदींचा नवा अजेंडा, परराष्ट्र मंत्र्यांनीही दिला संदेश

Subscribe

भारताला जी-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून भारताने जी-20 अध्यक्षपदाला सुरूवात केली आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या थीमने प्रेरित होऊन, जी-20 अध्यक्ष एकतेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करेल. हवामान बदल, दहशतवाद आणि साथीच्या रोगांसारख्या सर्वात मोठ्या आव्हानांना एकमेकांशी लढा देऊन सोडवता येणार नाही, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा दाखला देत ट्विट केले की, आज आपण जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारत आहोत. ही एकतेची सार्वत्रिक भावना आहे. आमचे जी-20 प्राधान्यक्रम केवळ जी-20 भागीदारांसोबतच नव्हे तर ग्लोबल साऊथमधील आमच्या सहप्रवाशांशी देखील सल्लामसलत करून आकारले जातील. आजची मोठी आव्हानं एकमेकांशी लढून सोडवता येत नाहीत. भारताचा अजेंडा सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

असुरक्षित घटकांकडे लक्ष देणे आवश्यक : एस जयशंकर

- Advertisement -

जयशंकर म्हणाले की, जी-20 हा जगातील आर्थिक आणि विकासाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्पित प्रमुख गट आहे. कठीण काळात जागतिक नेत्यांनी योग्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. जे विशेषतः जगातील अधिक असुरक्षित भागांवर परिणाम करतात.


हेही वाचा : पाकिस्तानच्या कोळसा खाणीत गॅसचा भीषण स्फोट, ९ कामगारांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -