‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात’; सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त विधान

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. 'राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल', असे वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

Sadabhau Khot has alleged that the NCP planned to attack me

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. ‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल’, असे वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. पुण्यातील नवी पेठेतील पत्रकार संघात वास्तव कट्टा आणि अर्हम फाऊंडेशन यांच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसह संवाद कार्यक्रमात खोत बोलत होते. (Sadabhau Khot controversy statement Maharashtra Politics)

माजी मंत्री आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार अभिमन्यू पवार या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सदाभाऊ खोत म्हणाले की, दरवर्षी राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन आयोजित केले पाहिजे. त्याचा फायदा होईल. राज्यकर्त्यांना सर्वांत जास्त भीत डोक्यांची वाटते. जिकडे जास्त डोकी, तिकड जास्त राज्यकर्ते बोलतात. कारण राज्यकर्ते हे एक रेड्याची औलाद आहे. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाही. तसेच त्यांना डोकी जास्त दिसली. तर ते आपोआप तुम्हाला नको असलेलेही बोलून जातात.

सरकार कोणाचेही असले तरी भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे देणारा तरुण पुढे जातो आणि अभ्यास करणारा तरुण मागे राहतो. भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बेरोजगारीशिवाय दुसरा प्रश्न काय आहे? बेरोजगारी हा सरकारच्या अजेंड्यावरचा विषय असला पाहिजे. सदाभाऊ राजकीय नेत्यांना रेडे म्हणाले, तरी हे रेडे लोकहिताचे असले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.


हेही वाचा – अरविंद केजरीवालांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट; आपच्या नेत्यांचे मोबाईल चोरीला