घरक्राइमकल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

Subscribe

अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण पश्चिम बस आगाराजवळील सर्वाधिक वर्दळीच्या भागातील न्यू मोनिका गृहसंकुलाच्या आवारात ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून एका १५ वर्षांच्या युवकाने तिची गळा चिरून हत्या केली. गुरुवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. हे दोघेही फिरस्ते आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित अल्पवयीन युवकाला अटक केली आहे.

त्यानेच मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले की, या मुलीच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी आपणास मारहाण केली होती. त्याचा राग मनात होता. तो वचपा काढण्यासाठी आपण या मुलीची धारदार पातेने गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी रस्त्यावरून ये-जा करणार्‍या पादचार्‍यांना गृहसंकुलाच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एका मुलीचा मृतदेह दिसला. ही माहिती पादचार्‍यांनी गृहसंकुलाच्या सदस्यांना दिली. त्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला.

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या सूचनेनुसार गृहसंकुलाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्यावेळी एक तरुण एका तरुणीला सोसायटीच्या आवारात घेऊन येत असल्याचे दिसले. याआधारे पोलिसांनी त्या युवकाचा शोध सुरू केला. वर्णनाच्या आधारे कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून संशयित युवकाला ताब्यात घेतले. त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता आपण मुलीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -