घरमनोरंजनअक्षय कुमारचा 'राम सेतू' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. दरम्यान, आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. परंतु हा पाहण्यासाठी तुम्हाला अधीक किंमत मोजावी लागणार आहेत.

प्राईम व्हिडीओवर झाला प्रदर्शित
अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला असून हा पाहण्यासाठी तुम्हाला 199 रुपये मोजावे लागतील. राम सेतु हिंदी भाषेव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगुमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

‘राम सेतू’ने बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी
‘राम सेतू’ 25 ओक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. हा चित्रपट तयार करण्यासाठी 150 कोटी खर्च करण्यात आले होते. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 92 कोटी कमावले आहेत.

देशभरातील 3000 स्क्रीन्स वर झाला होता प्रदर्शित
अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट देशभरातील 3000 स्क्रीन्स वर प्रदर्शित झाला होता. ‘राम सेतू’मध्ये अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडिस व्यतिरिक्त अभिनेत्री नुसरत भरुच देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय कुमाराने एका आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. जो आपल्या टीमसोबत राम सेतुच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी 7 हजार वर्ष जुन्या इतिहासाचा पडदा हटवताना दिसून येतो.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’च्या तुलनेत ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ची एन्ट्री ठरली फिकी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -