घरराजकारणसाई रिसॉर्ट प्रकरण : सांडपाण्याचा ओराप फोल ठरला तरी, बांधकाम पाडल्याचा सोमय्यांचा...

साई रिसॉर्ट प्रकरण : सांडपाण्याचा ओराप फोल ठरला तरी, बांधकाम पाडल्याचा सोमय्यांचा दावा

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. त्यांनी केलेल्या विविध आरोपांपैकी सांडपाण्याप्रकरणी केलेला आरोप फोल ठरले आहे. पण तरीही या रिसॉर्टचे काही अनधिकृत बांधकाम काल, शुक्रवारी जमीनदोस्त केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या मागील काही महिन्यांपासून माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी सातत्याने नवे आरोप करत आहेत. हा रिसॉर्ट पर्यावरणासंबंधित नियम पायदळी तुडवत चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच, रिसॉर्टमधील सांडपाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र पर्यावरण विभागाने या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. साई रिसॉर्टपासून काही अंतरावर सांडपाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी टाकी असल्याचे आढळले आहे. समुद्रापासून काही अंतरावर बांधण्यात आलेल्या या टाकीतील पाणी पाइपद्वारे समुद्रात सोडण्याची व्यवस्था नसल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोमय्यांचा हा आरोप फोल ठरला आहे.

- Advertisement -

पण तरीही त्यांनी या रिसॉर्टबद्दल आज, शनिवारी एक नव्याने ट्वीट केले आहे. मी 22 नोव्हेंबर रोजी जिथे हातोडा चालविला होता, ते शासकीय जागेवरील अनिल परब यांच्या साई रिसॉर्टचे अतिक्रमण काल तोडण्यात आले. नियमांचे उल्लंघन करत अनिल परब यांनी बांधलेले साई रिसॉर्टचे 15 हजार क्वेअर फूटचे अनधिकृत रिसेप्शन आणि प्रतीक्षा कक्ष जमीनदोस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी या ट्वीटरद्वारे करण्यात आला आहे. एकूणच त्यांचा एक आरोप फेल गेला असला तरी, आपली अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टविरुद्धची लढाई सुरूच असल्याचे त्यांनी या ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -