घरताज्या घडामोडी'तुका म्हणे' शब्दप्रयोग केल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा

‘तुका म्हणे’ शब्दप्रयोग केल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा

Subscribe

नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्द प्रयोग केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देहू संस्थानकडून देण्यात आला आहे. नवीन वर्ष साजरा करत असताना अनेक तरुण आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ असा उल्लेख करून शुभेच्छा देतात. पण हाच शब्द प्रयोग आता महागात पडू शकतो. कारण यावर देहू संस्थानने आक्षेप घेतला असून कडक कारवाई करण्याचा इशारा देहू संस्थानने दिला आहे.

देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, तरुण वर्गातून अनेक संतांच्या अभंगाची मोडतोड करुन शुभेच्छापत्रक तयार केलं जातं. तुका म्हणे ही जगदगुरू तुकोबा रायांची नाममुद्रा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही तुकोबा रायांची स्वाक्षरी आहे. ज्या वाक्याला आपण तुका म्हणे लावतो त्याला एक प्रमाण असतं, असं अध्यक्ष नितीन महाराज मोरे म्हणाले.

- Advertisement -

वारकरी सांप्रदायिकतेमध्ये ते आदराचं नाम आहे. त्यामुळे कोणीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना तुकाराम महाराजच नव्हे तर कुठल्याही संतांच्या नावाचा वापर करून चुकीचं विडंबन करु नये. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा जगदगुरू तुकोबा राय असोत यांच्या नावाचं जर कुणी विडंबन केलं, तर देहू संस्थांच्या नावाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही नितीन महाराज मोरे म्हणाले.


हेही वाचा : समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -