घरमहाराष्ट्रकोकणातील माणसाला कोकणातच हक्काचा रोजगार मिळवून देण्याला प्राधान्य, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोकणातील माणसाला कोकणातच हक्काचा रोजगार मिळवून देण्याला प्राधान्य, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Subscribe

मुंबई : कोकणातील माणसाला कोकणातच हक्काचा रोजगार मिळवून देण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य आहे. कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांना योग्य हमीभाव मिळवून देतानाच त्यांचे मूल्यवर्धन, ब्रँडिंग, मार्केटिंग करण्याला देखील प्राधान्य असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

कोकणाच्या भूमीतील पारंपरिक उद्योगांना ग्राहकमंच मिळवून देण्याकरिता गोरेगाव येथील नेस्को मैदानात ‘स्वराज्यभूमी कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘स्वराज्यभूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटन आज करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून समृद्धी महामार्गप्रमाणेच कोकणातील समुद्रकिनारे एकमेकांना जोडणारा मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

फडणवीसांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सुमधूर कोकणी भाषेतून केली. कोकणी भाषेतून बोलताना आपण चुकलो तर नाही ना याचीही खातरजमा करून घेतली. पण त्याचवेळी, आपल्या भाषणाला पुढे सुरुवात करताना आणि उपस्थितांचे आभार मानताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री’ असा केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार असला तरीही देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचं नियंत्रण होतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने राज्यातील कुजबुजीवर शिंदेंनी शिक्कामोर्तब केलंय की काय अशी चर्चा आता नव्याने रंगू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -