घरताज्या घडामोडीविनाकारण महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं अयोग्य, फडणवीसांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन

विनाकारण महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं अयोग्य, फडणवीसांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन

Subscribe

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. सीमावादाप्रकरणी केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी आणि चर्चाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, विनाकारण महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं हे अयोग्य आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून थेट संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मी फोनवरून चर्चा केली. कालच्या घटनेची संपूर्ण परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडली आहे. विनाकारण महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाहीये, हे त्यांच्या मी लक्षात आणून दिलं. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित देखील केलं आहे. गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या गाड्यांवर हल्ला होणे हे एकदम चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी ते तात्काळ थांबवावं, अशी विनंती गृहमंत्र्यांना केल्यानंतर ते त्यामध्ये निश्चितच लक्ष देतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत काल माझी फोनवरून चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवर जी दगडफेक करण्यात आली, त्यावर कठोर कारवाई करावी, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी आमची मागणी मान्य करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


हेही वाचा : महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -