घरलाईफस्टाईलसकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करा मशरूम सँडविच

सकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करा मशरूम सँडविच

Subscribe

अनेकदा आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये सँडविच खाणं पसंत करतो. सँडविचचा नाश्ता पचायला हलका आणि पौष्टिक मानला जातो. पण कधी कधी तोच भाज्याचा सँडविच खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही मशरूम सँडविच नक्कीच ट्राय करु शकता.

साहित्य :

- Advertisement -
  • ब्रेड स्लाइड 10-12
  • बटन मशरूम (आवश्यकतेनुसार)
  • लसूण 1 चमचा (सोलून चिरलेला)
  • कांदा 1 (बारीक चिरलेला)
  • कोबी 4-5 चमचे
  • शिमला 1 (बारीक चिरलेली)
  • मिरच्या 4-5
  • चीज क्यूब 2
  • टोमॅटो सॉस 2 चमचे
  • काळी मिरी – 1/4 चमचा
  • बटर (आवश्यकतेनुसार)
  • तेल 3 चमचे
  • मीठ (चवीनुसार)

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम मशरूम सँडविच बनवण्यासाठी कांदा, लसूण, शिमला मिरची सर्व बारीक चिरुन घ्या.
  • आता एका कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा.
  • तेल गरम झाल्यावर त्यात मशरूम, कांदा आणि लसूण घालून तळून घ्या.
  • सर्व साहित्य 1-2 मिनिटे परतून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेली कोबी आणि शिमला मिरची घालून शिजवा.
  • सर्व साहित्य 1-2 मिनिटे भाजल्यानंतर त्यात काळी मिरी, टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • 30 सेकंद शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि तयार मसाले एका भांड्यात काढून घ्या.
  • आता ब्रेडचे तुकडे घ्या आणि त्यावर बटर पसरवा. यानंतर तयार मसाला ब्रेडच्या स्लाइसवर चांगला पसरवा. आता त्यावर चीज किसून घ्या.
  • त्यावर शिमला मिरची आणि मशरूमचे तुकडे ठेवा आणि ब्रेडचे तुकडे बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा.
  • 180 डिग्री सेंटीग्रेडवर 5 मिनिटे बेक केल्यानंतर सँडविच बाहेर काढा.
  • चविष्ट मशरूम सँडविच गरमागरम टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : उरलेल्या भातापासून बनवा चटपटीत फ्राइड राइस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -