घरताज्या घडामोडीहिमाचलमधील विजयी काँग्रेस आमदारांची आज शिमल्यामध्ये बैठक

हिमाचलमधील विजयी काँग्रेस आमदारांची आज शिमल्यामध्ये बैठक

Subscribe

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर काँग्रेसने विजयी आमदारांची शुक्रवारी शिमल्यामध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांकडे दिले जाणार आहेत. हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला आणि पर्यवेक्षकही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर काँग्रेसने विजयी आमदारांची शुक्रवारी शिमल्यामध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी अपेक्षा आहे. हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला आणि पर्यवेक्षकही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सध्या प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांची मुख्यमंत्र्यांच्या दावेदारीसाठी नावे समोर येत आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभेची निवडणूक काँग्रेसने बहुमताने जिंकली असली तरी मुख्यमंत्री कोण होणार हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्या हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून काँग्रेसच्या दोन गटातील लढत वाढणार आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखाली शिबिर सुरू झाले आहे. काँग्रेसचा दुसरा गट म्हणजे ज्याचा केंद्रबिंदू ‘हॉलीलॉज’ आहे. हॉलिलॉज हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे निवासस्थान आहे. दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह स्वतः मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून उभ्या राहिल्या आहेत.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका यंदा काँग्रेसच्या मागील सरकारमध्ये सलग सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांच्याविनाच झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न करत मोठा विजय मिळवला. वीरभद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळालेल्या सांत्वनाचे भांडवल करण्यासाठी प्रतिभा सिंह यांना केवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले नसून, त्यांचे नामकरण प्रतिभा वीरभद्र सिंह असे करण्यात आले. प्रतिभा वीरभद्र सिंह यांनीही याच नावाने मंडी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकीत नाही तर, तीन विधानसभा मतदारसंघातही विजय मिळवला होता.

हॉलीलॉज जे समर्थक असलेले काँग्रेसचे आमदार आता प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र येत असल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने धूळ चारली. हिमाचलमध्ये काँग्रेसने 40 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. काँग्रेसने 40 जागा जिंकत हिमाचलमध्ये एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय 3 जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 43.9 टक्के तर भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. तर आपला फक्त 10.4 टक्के मत मिळाली आहेत. जनतेने यंदाही सत्ताबदलाची परंपरा कायम ठेवल्याचं हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतेय. या निवडणुकीत 2017 च्या तुलनेत भाजपच्या 19 जागा कमी झाल्या आहेत.


हेही वाचा – हिमाचलमध्ये 40 जागा जिंकत काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत; भाजपला ‘इतक्या’ जागांवर यश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -