घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात २४ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल, अहवालातून बाब समोर

गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात २४ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल, अहवालातून बाब समोर

Subscribe

ADR Report | एडीआरच्या अहवालानुसार, १८ टक्के मंत्र्यांचं वय ३१ ते ५० वर्षांपर्यंत आहे. तर, ८२ टक्के मंत्र्यांचं वय ५१ ते ८० वर्षे आहे. तर, मंत्रिमंडळात सहा टक्के महिला आहेत.

अहमदाबाद – गुजरातमध्ये नव्याने सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित मंत्र्यांकडून विविध अपेक्षा बाळगल्या गेल्या आहेत. परंतु, गुजरातच्या नव्या मंत्रिमंळात २४ टक्के मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहित समोर आली आहे. Gujarat Election Watch आणि Association for Democratic Reforms यांनी गुजरातमध्ये १७ मंत्र्यांनी दिलेल्या शपथपत्रांचं विश्लेषण करून अहवाल सादर केला आहे.

गुजरातमध्ये १७ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. यापैकी चार म्हणजेच २४ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. तसंच, सहा टक्के मंत्र्यांवर त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शपथपत्रात नमूद केली आहे.

- Advertisement -

१७ मंत्र्यांपैकी १४ मंत्र्यांवर कोट्यवधींचं कर्ज असल्याचीही माहिती समोर आली आहे. सिद्धपूर विधानसभा मतदारसंघाचे बलवंतसिंह चंदनसिंह राजपूत यांच्यावर १२.५९ कोटींचं कर्ज आहे. तसंच, या अहवालातून मंत्र्यांच्या शिक्षणाचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये ६ मंत्री आठवी ते बारावी पास आहेत. तर, ८ मंत्र्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आहे. तीन मंत्र्यांनी डिप्लोमा केलं असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा – गुजरात मंत्रिमंडळात राजपूत सर्वात करोडपती तर दोघे लखपती

- Advertisement -

एडीआरच्या अहवालानुसार, १८ टक्के मंत्र्यांचं वय ३१ ते ५० वर्षांपर्यंत आहे. तर, ८२ टक्के मंत्र्यांचं वय ५१ ते ८० वर्षे आहे. तर, मंत्रिमंडळात सहा टक्के महिला आहेत.

कोणाची किती संपत्ती?

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी पार पाडला. या मंत्रिमंडळात आठ जुने चेहरे आहेत तर आठ नवीन चेहेरे आहेत. यामध्ये सर्वात श्रीमंत मंत्री बलवंत सिंह राजपूत यांची संपत्ती ३७२ कोटी ६५ लाख ३४ हजार ८०१ रुपये आहे. त्यांची २६६ कोटी रुपयांची जंगम तर १०२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या बँक खात्यात सहा कोटी रुपयांची रोकड आहे. ४.८१ कोटी रुपयांचे दागिने आहेत. असे असले तरी बलवंत सिंह राजपूत यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही.
बलवंत सिंह राजपूत यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे चार कोटी रुपयांची कृषि जमीन आहे. २२ कोटी रुपयांची बिनशेती जमीन आहे. ३२ कोटी रुपयांची व्यावसायिक इमारत आहे तर ४३ कोटी रुपयांची रहिवासी इमारत आहे. त्याचे बाजारमूल्य १०६ कोटी रुपये आहे.
सर्वात कमी संपत्ती असलेल्या बच्चूभाई खाबड यांची मालमत्ता ९२.८५ लाख रुपये तर मुकेशभाई यांची संपत्ती ९७.१७ लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त अन्य मंत्र्यांची संपत्ती एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची आहे.
तसेच नवर्निवाचित मंत्री डॉ. कुबेरभाई डिंडोर हे सर्वात सुशिक्षित मंत्री आहेत. ५१ वर्षीय डिंडोर यांनी २०१२ मध्ये सरदार पटेल महाविद्यालयातून पीएचडी प्राप्त केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -