घरमहाराष्ट्रअंधारे-राऊतांच्या माफीवर भाजपा ठाम, आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्रसाद लाड यांचा इशारा

अंधारे-राऊतांच्या माफीवर भाजपा ठाम, आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्रसाद लाड यांचा इशारा

Subscribe

Mafi Mango Andolan | सुषमाताई, हा महाराष्ट्र वारकरी पंथांचा आहे. त्यांचा अपमान आम्ही कधीही सहन करून घेणार नाही. सुषमा अंधारे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे माफी मागत नाहीत तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत, असं प्रसाद लाड म्हणाले.

मुंबई – संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयी चुकीची माहिती दिल्याने भाजपाने त्यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. तर, सुषमा अंधारे यांनी देवी-देवता आणि संतांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे आणि संजय राऊत माफी मागत नाहीत तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. दादर येथे माफी मांगो आंदोलनात त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना हा निर्धार बोलून दाखवला.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी भाजपाचे खासदार गृहमंत्र्यांना का भेटले नाहीत? रोहित पवारांचा सवाल

- Advertisement -

प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत तुम्हाला काल दोन पुस्तके पाठवली आहेत, ती पुस्तके वाचा. माझ्या तोंडून शब्द निघाला तर तुम्ही वळवळात. मी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती म्हणून रायगडावर झाला. पण तुम्ही त्यावरून राजकारण केलं. पण आम्ही घाबरत नाही. तुमची जेवढी ताकद आहे तेवढा मोर्चा काढा. जोपर्यंत महाराष्ट्रात हिंदू आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी देशावर राज्य करतील. सुषमा अंधारे वारकरी पंथांचा अपमान करतात. ज्ञानोबांचा अपमान करतात. तुकारामांचा अपमान करतात. सुषमाताई, हा महाराष्ट्र वारकरी पंथांचा आहे. त्यांचा अपमान आम्ही कधीही सहन करून घेणार नाही. सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरे माफी मागत नाहीत तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत, असं प्रसाद लाड म्हणाले.


महाविकास आघाडी सरकारने आज मोर्चा आयोजित केला आहे. पण डॉ.बाबासाहेबांच्या जन्मस्थळाविषयी चुकीची माहिती देणाऱ्या संजय राऊतांचा ते निषेध करतील का? संतांविषयी वादग्रस्त बोलणाऱ्या सुषमा अंधारे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मतारखेवरून घोळ घालणाऱ्या अमोल मिटकरींचा या महामोर्चातून निषेध होणार आहे का? असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. देशात, राज्यात कळीचं राजकारण करायचं, जातीयवाद पेटवायचा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कोरोनात संपूर्ण देश बंद होता. ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवला त्या याकुब मेननची कबर या कोरोना काळात सजवली जात होती. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होती. तेव्हाच छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम वाढत होते. आम्ही सत्तेवर आल्यानंतर अनधिकृत बांधकाम हटवले. आता भाड्याचे लोक आणून मोर्चे कराल. हे शिंदेंचं सरकार आहे, विकासाचं सरकार आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीत तुमच्याशी लढण्यासाठी तयार आहोत, असा थेट हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला.

- Advertisement -


भुत्तो नावाचा डुक्कर आमच्या पंतप्रधानांविषयी बोलतो, ज्या पाकिस्तानात राहायला अन्न नाही, निवारा नाही, त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याला आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असंही प्रसाद लाड म्हणाले.

हेही वाचा – सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी उरलं असेल तर…, संजय राऊतांचं आवाहन

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -