घरक्रीडाFifa world cup 2022 : विजेत्या संघाला मिळणार 'इतकी' रक्कम

Fifa world cup 2022 : विजेत्या संघाला मिळणार ‘इतकी’ रक्कम

Subscribe

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे यंदाचे 22वे पर्व असून या पर्वात एकूण 440 दशलक्ष डॉलर्संची रक्कम बक्षीस म्हणून वितरित केली जाणार आहे. मागील हंगामापेक्षा ही रक्कम 40 दशलक्ष डॉलर्स अधिक आहे.

फिफा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या दोघांमधील अंतिम सामना 18 डिसेंबर, रविवारी होणार आहे. अशातच अंतिम सामन्यातील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाणार हे देखील समोर आले आहे. (fifa world cup 2022 Final Match prize money for winner and runner up revealed know)

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेचे यंदाचे 22वे पर्व असून या पर्वात एकूण 440 दशलक्ष डॉलर्संची रक्कम बक्षीस म्हणून वितरित केली जाणार आहे. मागील हंगामापेक्षा ही रक्कम 40 दशलक्ष डॉलर्स अधिक आहे. त्यानुसार, यंदा ट्रॉफी व्यतिरिक्त, फिफा विजेत्या संघाला 42 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 344 कोटी भारतीय रुपये) इतकी रक्कम दिली जाणार आहे. तसेच, उपविजेत्या संघाला 30 दशलक्ष डॉलर (सुमारे 245 कोटी भारतीय रुपये) बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.

- Advertisement -

उपांत्य फेरीचे सामने संपून दोन फायनलिस्ट समोर आले आहेत. फ्रान्स आणि अर्जेंटिना हे दोन संघ फायनलमध्ये पोहोचले असून आता दोघांमध्ये फायनलची लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव केला.

यंदाच्या हंगामात फिफा विश्वचषकातील इतर संघावरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. त्यानुसार, अंतिम फेरीतील विजेत्या आणि उपविजेत्या संघा व्यतिरिक्त, तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 27 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 220 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. या तिसऱ्या क्रमांकासाठी मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात आज सामना होणार आहे. तसेच, चौथ्या क्रमांकाच्या संघाला 25 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 204 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत.

- Advertisement -

5व्या ते 8व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 17 मिलियन डॉलर्स (सुमारे 138 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. 9 ते 16 व्या क्रमांकावरील संघांना 13 मिलियन डॉलर्स (सुमारे 106 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. तसेच, 17 ते 32व्या क्रमांकावरील संघांना बक्षीस म्हणून 9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 74 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत.


हेही वाचा – दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा माझी आई…, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूने सांगितली हृदयस्पर्शी आठवण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -