घरताज्या घडामोडीमेक्सिकोमध्ये थरार! कारागृहावरील अज्ञातांच्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू, 24 कैदी फरार

मेक्सिकोमध्ये थरार! कारागृहावरील अज्ञातांच्या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू, 24 कैदी फरार

Subscribe

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये असलेल्या एका कारागृहावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात हल्लोखोरांनी (Gunmen Attacked Prison) हा गोळीबार केला असून, या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये असलेल्या एका कारागृहावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात हल्लोखोरांनी (Gunmen Attacked Prison) हा गोळीबार केला असून, या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 सुरक्षारंक्षांसह 4 कैद्यांचा समावेश आहे. (Mexico gunmen attacked prison in northern Mexican city of ciudad Juarez gun firing 14 people dead)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील (Mexican City) सिओडाड जुआरेजमधील (Ciudad Juarez) एका तुरुंगावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात 14 जण ठार झाले असून 24 कैदी पळून गेले आहेत. या गोळीबारानंतर चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटरच्या (Chihuahua State Prosecutors) कार्यालयाने निवेदन जारी केले आहे. या निवेदनात, हल्ल्यादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी Armored Vehicles चा वापर केला होता. मृतांमध्ये 10 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. तर चार कैंद्याचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

याशिवाय, निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी बुलेव्हार्डजवळ सशस्त्र लोकांनी महापालिका पोलिसांवरही गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोरांनी तुरुंगाबाहेरील सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला.

नववर्षानिमित्त काही कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी कॅम्पसबाहेर थांबले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी तुरुंगात काही कैद्यांनी अनेक वस्तूंना आग लावली आणि कारागृहाच्या सुरक्षारक्षकांशी झटापट केली.

- Advertisement -

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर चार कैद्यांचा मृत्यू झाला, तर गोंधळाचा फायदा घेत 24 कैद्यांनी कारागृहातून पळ काढला. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असून पळून गेलेल्या कैंद्याचाही शोध सुरू आहे.

याआधीही मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मेक्सिकोमधील बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले होते. मेक्सिकोमधील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला होता. यात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – माझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -