घरमनोरंजनगौतमी पाटीलच्या 'घुंगरू' चित्रपटाचं शूटिंग थायलंडमध्ये

गौतमी पाटीलच्या ‘घुंगरू’ चित्रपटाचं शूटिंग थायलंडमध्ये

Subscribe

लावणीच्या नावाखाली अश्लील नृत्य करणारी गौतमी पाटील सातत्याने चर्चेत असते. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतत अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यानंतर तिला चांगलाच फेम मिळाला. यानंतर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले. गौतमीच्या या डान्स प्रकरणावर कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक लावणी नृत्यांगणांनी गौतमीवर बंदीची मागणी केली, मात्र गौतमी पाटील आता लवकरचं चित्रपटात एन्ट्री करणार आहे. ‘घुंगरु’ असं तिच्या आगामी चित्रपटाचे नावं असून यामध्ये गौतमीच्या नृत्यासह तिचा अभिनय देखील पाहता येणार आहे.

थायलंडमध्ये होणार शूट…
भारतातील सोलापूर, माढा आणि हंपी येथे चित्रपटाचे काही सीन शूट करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ‘घुंगरु’ चित्रपटाचे शूटिंग जवळपास अर्धे झाले असून आता बाकी शूटिंग थायलंडमध्ये होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि लेखन बाबा गायकवाड यांनी केली आहे. शिवाय चित्रपटात गौतमी सोबत हेच मुख्य कलाकार म्हणून झळकणार आहेत. यांच्या व्यतिरिक्त शीतल गीते, सुदाम केंद्रे, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, वैभव गोरे हे कलाकार देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारतील.

- Advertisement -

गौतमी अश्लील हावभाव आणि नृत्यामुळे वादात
गौतमीने आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावले. आजही महाराष्ट्रात तिच्या प्रत्येक कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढतेय. मात्र अनेक लावणी कलाकारांनी तिच्यावर आक्षेप घेतला. लावणीच्या नावाखाली अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचे आरोप गौतमी पाटीलवर झाला. ज्यामुळे ती विशेष चर्चेत आली. गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,ज्यात ती एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, अश्लील हावभाव करत नाचताना दिसतेय. यावरून तिला बरचं ट्रोल करण्यात आलं.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘बेशरम रंग’ कॉपी केल्याचा पाकिस्तानी गायक सज्जाद अलीचा आरोप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -