घरताज्या घडामोडीकेसरकरांचे आत्मपरीक्षण म्हणजे त्यांच्याच गटात मतभेद; संजय राऊतांचा हल्लाबोल

केसरकरांचे आत्मपरीक्षण म्हणजे त्यांच्याच गटात मतभेद; संजय राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ज्याअर्थी दीपक केसरकरांनी दोन्ही गट एकत्र यावेत असे आत्मपरिक्षण केले. केसरकरांच्या या आत्मपरिक्षणानंतर त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताहेत म्हणजे त्यांच्याच गटात दोन गट झाले आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिले. “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही”, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Shinde Group MLA Deepak Kesarkar)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते. “जे गद्दार सोडून गेलेले आहेत, त्यांना पुन्हा विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवायचे नाही, असे राज्याच्या जनतेने ठरवलेले आहे. आत्मपरिक्षणाची अजिबात गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्वीपेक्षा आता जोमाने वाढते आहे. तसेच, ज्याअर्थी दीपक केसरकरांनी दोन्ही गट एकत्र यावेत असे आत्मपरिक्षण केले. केसरकरांच्या या आत्मपरिक्षणानंतर त्यांच्यातोंडून हे शब्द बाहेर पडताहेत म्हणजे त्यांच्याच गटात दोन गट झाले आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारही काल म्हणाले की, माझ्याच पक्षातील नेत्याने माझ्याविरोधात कट रचला आहे. माझ्याच गटातले लोक माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून काही गोष्टी स्पष्ट होतात की, त्यांच्या गटात काय सुरू आहे. या गटात असलेल्या अंतर्गत वादामुळे हे सरकार जास्तकाळ टीकणार नाही. हा कटही टीकणार नाही. या गटातील अर्धापेक्षा अधिक लोक भाजपामध्ये स्वत:ला विलीन करून घेतली. हेच या लोकांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्या लोकांना पुन्हा शिवसेना स्विकारणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आता पर्याय नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

“दीपक केसरकर यांनी आत्मपरिक्षणाची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या गटाचे एक वैफल्य आणि निराशा आहे. गेलेले १६ आमदार अपात्र ठरतील. कायदेशीर रित्या आमची बाजू भक्कम आहे. याचिकेवरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाच विलंब होतोय. पण निकाल आमच्याच बाजूने लागेल”, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

“विधानसभेत मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या विकासावर भाष्य करण्यासाठी संधी मिळते. जनतेच्या विकासावर आणि योजनांवर बोलण्याची संधी असते. मुख्यमंत्री जर विधानसभेत उखाळ्या पाकाळ्या काढत असतील, तर राज्याच्या विकासावर कोण बोलणार?, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण म्हणजे गल्लीतील भाषण आहे. त्यांना बेकायदेशीरपणे संधी मिळाली असली तरी, त्यांनी सय्यमाने बोलणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलत असताना भान ठेवले पाहिजे”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.


हेही वाचा – नोटाबंदीचा निर्णय योग्य होता? आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -