घरनवी मुंबईकोकण शिक्षक आमदार निवडणुकीचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू

कोकण शिक्षक आमदार निवडणुकीचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू

Subscribe

Konkan teacher MLA election | अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकान्वये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

नवी मुंबई – कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये एकूण 37 हजार 719 मतदार आहेत. तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, याचा भंग होणार नाही याबाबत विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. आज कोकण भवनातील समितीसभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – कांदा निर्यातीने भरभराट; देशाच्या तिजोरीत ‘इतके’ हजार कोटी डॉलर्स

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाकडून 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी बुधवार 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीनुसार कोकण विभगात एकूण 30 हजार 162 मतदार असून त्यापैकी 16 हजार 82 स्त्री मतदार असून 14 हजार 80 पुरुष मतदार होते.

या मतदार याद्यांवर 23 नोव्हेंबर ते 09 डिसेंबर 2022 या कालावधीत प्राप्त झालेले दावे व हरकती निर्णीत करून कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी शुक्रवार 30 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली. या अंतिम यादीनुसार कोकण विभागात एकूण 37 हजार 719 मतदार असून त्यापैकी 18 हजार 97 स्त्री मतदार आहेत तर 19 हजार 622 पुरुष मतदार आहेत. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकान्वये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MARD Strike : रुग्णांचे हाल, शस्त्रक्रिया रखडल्या; पण मागण्यांसाठी डॉक्टर ठाम

30 जानेवारी रोजी मतदान

12 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक असेल. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. 16 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. 30 जानेवारी रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 अशी असेल. दि. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -