घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकांदा निर्यातीने भरभराट; देशाच्या तिजोरीत 'इतके' हजार कोटी डॉलर्स

कांदा निर्यातीने भरभराट; देशाच्या तिजोरीत ‘इतके’ हजार कोटी डॉलर्स

Subscribe

राकेश बोरा । लासलगाव

उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणार्‍या कांदा निर्यातीतून देशाला एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ याकालावधीत १३ लाख ५४ हजार ७९१ मॅट्रिक टन कांदा निर्यात होऊन २३५५ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. पुरवठ्यातील सातत्य, विश्वासार्हता आणि कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहचविण्याची भारतीय निर्यातदारांची क्षमता यामुळे कांदा निर्यात सुरू आहे.केंद्राने शेतमाल निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण अवलंबल्यास निर्यातीत अजून लक्षणीय वाढ होऊ शकते.

- Advertisement -

देशात ऐकून २६ राज्यात कांदा पीकू लागल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ होत आहे मात्र निर्यात जैसे ते असल्याने कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही.या साठी दीर्ध कालीन धोरण ठरवने आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना,कंटेनर भाड्यात घट,ट्रान्झिन्ट अनुदान या उपाययोजना केल्यास निर्यातीतुन मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळेल आणि कांदा दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

भारतात दरवर्षी सुमारे २०० दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते. एकूण उत्पादनाच्या ९०% पर्यंत देशांतर्गत वापरासाठी वापरले जाते तर उर्वरित साठा करुन योग्य वेळी तो निर्यात केला जातो. भारत दरवर्षी अनेक देशांना कांदा निर्यात करतो. कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर अनुक्रमे हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. सर्वाधिक उत्पादन करणार्‍या महाराष्ट्रात यावेळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

या प्रमुख देशात निर्यात
  • बांग्लादेश
  • मलेशिया
  • श्रीलंका
  • नेपाळ
  • युनाईटेड अरब
  • इंडोनेशिया
  • कतार
  • हाँगकाँग
  • कुवेत
  • व्हिएतनाम

चालू वर्षी माहे एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांचे कालावधील कांदा निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळाले असले तरी बाजार समित्यांमध्ये होत असलेल्या वाढत्या कांदा आवकेचा विचार करता देशांतर्गत मागणी पूर्ण होवून शिल्लक राहणार्‍या कांदा निर्यातीस अजून चालना देणे गरजेचे आहे. श्रीलंका आणि बांगलादेश च्या अंतर्गत प्रॉब्लेम मुळे दूसर्‍या देशात नवीन व्यापार वाढला पाहिजे, निर्यातीला चालना मिळाली पाहिजे. तेव्हा शिल्लक राहणारा कांदा जास्तीत जास्त निर्यात होऊन परकीय चलन वाढेल. : सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -