घरदेश-विदेशLIVE : भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

LIVE : भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Subscribe

छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आज होणार आहे. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.

रायपूर – टी. एस. सिंह देव आणि ताम्रध्वज साहू यांनी घेतली मंत्री पदाची शपथ.

- Advertisement -

भूपेश बघेल यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

- Advertisement -

भूपेश बघेल थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. पावसामुळे सायन्स कॉलेज मैदानातील शपथविधी कार्यक्रम रद्द करण्यात आला. तर आता बलबिरसिंह जुनेजा इनडोर स्टेडिअममध्ये शपथविधी सोहळा होणार आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतिलाल वोरा उपस्थित आहेत. बघेल यांच्यासोबत टीएस सिंहदेव आणि ताम्रध्वज देखील मंत्री पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, चंद्रबाबू नायडू, कुमार स्वामी सहभागी होणार आहेत.


भोपाळच्या जम्बरू मैदानामध्ये शपथविधी सोहळा सुरु आहे. या शपथविधी कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी उपस्थिती लावली.


मध्यप्रदेशच्या १८ व्या मुख्यमंत्री पदाची कमल नाथ यांनी शपथ घेतली. तर राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दोघांकडून शपथ घेतली. या शपखविधी सोहळ्याला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील उपस्थिती लावली. त्यांनी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना शुभेच्छा दिल्या.


छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा आज होणार आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपला धुळ चारत निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव केला आहे. त्यानंतर आज तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा सोहळा होणार असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गेहलोत, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भूपेश बघेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -