घरमहाराष्ट्रमुंबईकरांना 'एरंगळ जत्रे'साठी बेस्टकडून दिलासा, ६६ जादा बस सोडणार

मुंबईकरांना ‘एरंगळ जत्रे’साठी बेस्टकडून दिलासा, ६६ जादा बस सोडणार

Subscribe

BEST Busses | सदर बसगाड्यांमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज मालवणी आगार इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

BEST Busses for Erangal Fair | मुंबई – बेस्ट उपक्रमाने ८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एरंगळ जत्रेला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ६६ जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जत्रेला ये – जा करणाऱ्या नागरिकांना बेस्ट बसमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागामार्फत दरवर्षी ‘एरंगळ जत्रे’साठी जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येते.

हेही वाचा – पोलिसांसाठी खूशखबर, राज्य सरकारकडून गणवेश भत्त्यात वाढ

- Advertisement -

बेस्ट उपक्रम सध्या दोन हजार कोटी रुपयांनी तुटीत सुरू आहे. विशेषतः परिवहन विभागाची तूट मोठी आहे. मात्र तरीही बेस्ट उपक्रमाकडून गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आदी प्रसंगी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळतो तर बेस्टच्या तिजोरीत तेवढीच जादा कमाई जमा होते.

हेही वाचा – पाळीव प्राण्यांवरचे प्रेम मान्य पण…; उच्च न्यायालयाने सुनावले

- Advertisement -

८ जानेवारी रोजी ‘एरंगळ जत्रे’ ला सुरुवात होणार आहे. या यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट परिवहनतर्फे मालाड स्थानक (पश्चिम) ते एरंगळ आणि मार्वे बीच ते मढ जेट्टी, मार्वे बीच ते एरंगळ दरम्यान बसमार्ग क्र. २७१, तसेच बोरीवली बसस्थानक (प.) ते मढ जेट्टी दरम्यान बसमार्ग क्र. २६९ अशा एकूण सकाळी २२ आणि संध्याकाळी ४२ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या जादा बसगाड्या सकाळी ६ पासून चालविण्यात येणार आहेत. तसेच, या बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभल्यास आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

सदर बसगाड्यांमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी मालाड स्थानक (पश्चिम), मार्वे बीच, मढ जेट्टी, एरंगळ, भाटी व्हिलेज मालवणी आगार इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. बस निरीक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा – वरवरा राव यांना उपचारासाठी जायचंय हैदराबादला; न्यायालयाकडे मागितली परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -