घरमनोरंजन'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, तासाभरात मिळाले मिलियन व्ह्यूज

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, तासाभरात मिळाले मिलियन व्ह्यूज

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’आणि ‘झूमे जो पठाण’ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ज्यातील ‘बेशरम रंग’गाण्यामुळे चित्रपटाला विरोध केला जात आहे. दरम्यान, अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अवघ्या काही मिनीटांमध्ये या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाल्या आहेत.

ट्रेलरमध्ये शाहरुख, दीपिका आणि जॉन अब्राहम अॅक्शन मोड

- Advertisement -

नुकत्याच काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलेला हा ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख, दीपिका आणि जॉन अब्राहम अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शिवाय चित्रपटात दीपिका आणि शाहरुखची रोमाँटिक केमिस्ट्री देखील दिसत आहे. चाहते हा ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

‘बेशरम रंग’गाण्यातील भगव्या बिकनीमुळे वाद
‘बेशरम रंग’गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. काही राजकीय पक्षांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी देखील घातली आहे.

- Advertisement -

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

‘पठाण’ वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया म्हणाला… कलाकार म्हणून आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -