घरताज्या घडामोडीदिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चर्चा, विमानतळावर उडाला गोंधळ

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चर्चा, विमानतळावर उडाला गोंधळ

Subscribe

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून पुण्याला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेसंदर्भातील माहिती मिळताच प्रवाशांमध्ये आणि विमानतळावर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सतर्कता दाखवत अलर्ट जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान आज संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास विमानतळावरून उड्डाण घेणार होतं. परंतु त्याचवेळी विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विमानाला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. शिवाय बॉम्बचा शोध घेण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा फोन टेकऑफपूर्वी आला होता. दिल्ली विमानतळावर विमानाची तपासणी केली जात आहे. परंतु आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

मॉस्को-गोवा फ्लाइटमध्येही मिळाली होती बॉम्बविषयी माहिती

मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्येही सोमवारी संध्याकाळी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. गोव्याकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांना गुजरातमधील जामनगरकडे वळवण्यात आले आणि गोवा एटीसीला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान चालकाला जामनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आली, असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मंगळवारी मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमधील प्रवाशांची सुरक्षा दलांनी चौकशी केली. मात्र, या फ्लाइटमध्ये काहीही संशयास्पद आढळून न आल्यानंतर विमान जामनगरहून गोव्यासाठी रवाना करण्यात आले.


हेही वाचा : विमान प्रवाशांचा नेमका ‘क्लास’ कोणता? सोडले ताळतंत्र, नैतिकतेला तिलांजली!


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -